प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर येथील प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीने रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केले. 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रियदर्शिनी भवन, सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरपर्सन वैशाली मजुकर होत्या. यावेळी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, सोसायटीच्या उपाध्यक्षा नम्रता पाटील, नवहिंद प्रबोधिनीच्या अध्यक्षा शुभांगी पाटील, नवहिंद सोसायटीचे चेअरमन उदय जाधव, न्यू नवहिंद सोसायटीचे चेअरमन दशरथ पाटील, सल्लागार सी. व्ही. पाटील, नारायण बस्तवाडकर व संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
चेअरपर्सन वैशाली मजुकर यांनी या वर्षांचा रौप्यमहोत्सवी अहवाल मांडला. आम्ही हे वर्ष अत्यंत साधेपणाने करत आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे काहीसे आर्थिक संकट आले. त्यामधूनही आम्ही मार्ग काढत सोसायटीला मजबूत बनविले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या सोसायटीकडे 60 कोटी 62 लाखांचे खेळते भांडवल आहे. 13 कोटी 53 लाखांची गुंतवणूक आहे. 57 कोटी 32 लाखांच्या ठेवी आहेत. सोसायटीने 44 कोटी 42 लाखांची कर्जे वितरित केली आहेत. सोसायटीला 5 लाख 20 हजार रुपये नफा झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी इतिवृत्ताचे वाचन वंदना धामणेकर यांनी केले. शाखा व्यवस्थापक प्रशांत कंग्राळकर यांनी ताळेबंदपत्रकाचे, शाखा व्यवस्थापक अनिल पाटील यांनी नफा-तोटा पत्रकाचे वाचन केले. शाखा व्यवस्थापक शामल जाधव यांनी नफा विभागणी पत्रकाचे वाचन केले. सीमा घाडी यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. कांचन पाटील यांनी सोसायटीच्या कार्याचा आढावा घेतला व त्यांनी सोसायटीला पुढील वषी निश्चितच चांगला नफा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
नवहिंदचे संचालक प्रकाश अष्टेकर यांनीही यावेळी काही मौलिक सूचना केल्या व सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षाप्रसंगी शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी सोसायटीच्या कर्मचाऱयांनी स्वागतगीत म्हटले. शाखा व्यवस्थापिका सरिता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. व्हा. चेअरपर्सन नम्रता पाटील यांनी आभार मानले.
यावेळी प्रदीप मुरकुटे, अनिल हुंदरे, आनंद पाटील, आनंद मजुकर, दत्ता उघाडे, नवहिंद क्रीडा केंद्राचे कार्यकर्ते, नवहिंद महिला प्रबोधिनी संघाच्या कार्यकर्त्या, सर्व संचालिका, कर्मचारी, भागधारक उपस्थित होते.