बेंगळूर/प्रतिनिधी
प्रेस क्लब ऑफ बेंगळूरच्या वार्षिक पुरस्कारासाठी विप्रो लिमिटेडचे अध्यक्ष अजीम प्रेमजी आणि नारायण हेल्थचे संस्थापक अध्यक्ष डॉ. देवी प्रसाद शेट्टी यांची निवड झाली आहे.
प्रेमजी यांची ‘प्रेस क्लब पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, तर डॉ. शेट्टी आणि अभिनेते-दिग्दर्शक सुदीप संजीव यांची प्रेस क्लब विशेष पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
प्रेस क्लबच्या वार्षिक पुरस्कारासाठी २५ वरिष्ठ पत्रकारांची निवड करण्यात आली आहे. प्रेस क्लब ऑफ बेंगळूरने (पीसीबी) एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते फेब्रुवारीच्या तिसर्या आठवड्यात पुरस्कार वितरण आणि सत्कार करण्यात येणार असल्याचे पीसीबीने सांगितले.