विलासपूर परिसरात तब्बल 800 कुटूंबाना घरपोच मदत : समाजसेवक फिरोजभाई यांनी स्वःखर्चातून जोपासला सामाजिक वसा
प्रतिनिधी / गोडोली
कोरोनाची धास्ती वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आला मात्र सामान्य माणसांना ना रोजगार ना कोणी ही मदत केली नाही. विलासपूर परिसरात गेल्या लॉकडाऊनपासून गरजूंना मदतचा ओघ सुरू आहे. या सत्कार्याची चर्चा कमी पण मदतीत सातत्य समाजसेवक फिरोजभाई पठाण यांनी ठेवले आहे. पुन्हा आता लॉकडाऊन झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाल्याने विलासपूर परिसरातील तब्बल 800 गरजू कुटूंबांना 15 दिवस पुरेल एवढा भाजीपाला, फळे, जीवनावश्यक वस्तूंचे किट कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरपोच केले आहे. तर लहान मुले असणाऱया कुटूंबाना नियमित दूध, अंडी गेली वर्षभर देत असून यापुढे ही मदत सुरू ठेवण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलही जोपासत समाजसेवक अशी ओळख असलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाचे अध्यक्ष फिरोजभाई पठाण यांनी गुरूवार दि.29 रोजी विलासपूर परिसरात स्वखर्चाने केलेल्या मदतीतून गरजू कुटूंबाना मोठा दिलासा मिळाला.
कोरोनाचा कहर सुरू असून लॉकडाऊनमुळे सामान्य माणसांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विलासपूर परिसरातील तब्बल 800 हून अधिक कुटूंबाना याची चांगलीच झळ पोहोचली आहे. गतवर्षी अशीच परिस्थिती निर्माण झाली तेव्हा सदैव जनसेवेसाठी तत्पर असलेले समाजसेवक फिरोज पठाण यांनी या सर्व कुटूंबांना उदरनिर्वाहासाठी आवश्यक धान्य, पालेभाज्या, दूध, अंडी अशी मदत करून मोठा आधार दिला होता. पैकी ज्यांच्या घरात लहान मुल आहे, अशा कुटूंबाला रोज दूध आणि अंडे आजअखेर पुरवले जात आहे.
अनेकजण परिस्थितीला दोष, प्रशासनाच्या विरोधात बोलण्याची स्टंटबाजी करण्यात माहिर आहेत. स्वतः काही ही न करता इतरांची मापे काढण्याची काहींना सवय जडलेली आहे. मात्र आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्या प्रेरणेतून सतत जनसेवेत व्यस्त राहणारे समाजसेवक फिरोज पठाण यांनी विलासपूर परिसरात एक ही कुटूंब उपाशीपोटी राहणार नाही, याची गतवर्षीपासून दक्षता घेतली आहे. त्यांचे निवडक कार्यकर्ते कोणालाही काही अडचण असल्यास ते फिरोज पठाण यांच्यामार्फत शक्य ती मदत मिळवून देत असतात. गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकीचा वसा मोठय़ा उत्साहात जोपासणाऱया आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून फिरोज पठाण यांनी स्वखर्चातून गुरूवारी सायंकाळी विलासपूर परिसरातील गरजूंना एकाचवेळी उदरनिर्वाहासाठी आवश्यक अन्नधान्य, भाजीपाला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरपोच केला.
विलासपूर, राधिकानगर, फॉरेस्ट कॉलनी, गणेशनगर, तलाठी कॉलनी, मोरेवस्ती, गिरीचिंतन कॉलनी, पंचशिलनगर, आदर्शनगर, झडपवस्ती, बापूजी साळुंखेनगर, संगम कॉलनी, इंदिरानगर, अजंठा चौकालगतच्या झोपडपट्ठीतील गरजूंना मोठया प्रमाणावर एकाचवेळी घरपोच मदत करून माठा दिलासा समाजसेवक फिरोज पठाण यांनी दिला आहे.
यात नगरसेविका मनिषा काळोखे, जितेंद्र शिंगटे, आप्पा पिसाळ, अभय जगताप, सचिन पाटील, शशी वनवे, अमित महिपाल, प्रकाश पाटील, महेश चव्हाण, निरंजन कदम, सुहेल सय्यद, मिनिष सावंत, विनायक बनकर, वनिता कन्हेरकर, अरविंद कांबळे, नवनाथ टकले, मालती साळुंखे, आसिफ फरास, मुन्ना मिस्त्राr, फिरोजशेठ मुल्ला, हेमलता किरवे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
रोज अंडे, फळे आणि दूध
विलासपूर परिसरात मोलमजूरी करणारी अनेक गरीब कुटूंब आहेत. रोजगार मिळाला तर पोटभर खाईल मिळणाऱया 60 हून अधिक कुटूंबातील प्रत्येक लहान मुलांना मार्च 2020 पासून आजअखेर रोज 200 मिली दूध, फळे आणि एक अंडे घरपोच पोहोच केले जाते. समाजसेवक फिराजभाई पठाण यांच्या या सत्कार्याने कोरोनाचा कहर वाढला असताना ही या कुटूंबातील मुले निरोगी आहेत. निरपेक्ष भावनेने मी गरजुंना मदत करत असून याला अधिक प्रसिध्दी नको. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शक्य ती उपाययोजना करण्यात सध्या फिरोजभाई पठाण व्यस्त असल्याचे दिसत होते.