प्रतिनिधी /फोंडा
वेलिंग प्रियोळ येथे भर रस्त्यात झाड कोसळल्याने पणजी-फोंडा महामार्गावरील वाहतूक तासभर खोळंबून राहिली. शुक्रवारी सायंकाळी 5 वा. सुमारास ही घटना घडली. या महामार्गावर वाहनांची रहदारी मोठय़ाप्रमाणात सुरु असते. मात्र ज्यावेळी हे झाड कोसळले तेव्हा काहीवेळ रस्त्यावर एकही वाहन नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. झाड कोसळताना वीज तारांवर पडल्याने दोन वीज खांब मोडून पडले. त्यामुळे वीज पुरवठय़ावरही परिणाम झाला. फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तासाभराच्या मदतकार्यानंतर झाड बाजूला हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.