प्रतिनिधी/ रत्नागिरी
तुमचे पेटीएम खाते केवायसी करण्यात आलेले नाही. त्यासाठी बँकेचे डिटेल्स सांगा, अशी बतावणी करून वृद्धाला 80 हजाराचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आह़े रमाकांत रामचंद्र केळकर (61, ऱा मजगांव रत्नागिरी) असे या वृद्धाचे नाव आह़े या प्रकरणी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी केळकर यांच्या मोबाईलवर मनिषकुमार नावाच्या इसमाने फोन केला होत़ा यावेळी तुमचे पेटीएम खाते केवायसी केले नाहीत तर तुमचे खाते सील करण्यात येईल, अशी बतावणी केल़ी यावेळी मनिषकुमार याने केळकर यांच्याजवळ बँक खात्याची माहिती विचारल़ी मनिषकुमार याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून केळकर यांनी आपली बेंक खात्याची डिटेल्स व मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर मनिषकुमार याला सांगितल़ा यावेळी केळकर यांना खात्यातून 80 हजार रूपये काढल्याचा मेसेज मोबाईलवर आल़ा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल़े या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मनिषकुमार याच्याविरूद्ध भादंवि कलम 420 नुसार गुन्हा दाखल केला आह़े पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत़