ऑनलाईन टीम / बेंगळूर :
बेंगळूर येथील बायोकॉन लिमिटेडच्या प्रमुख किरण मजूमदार शॉ यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. स्वतः किरण मजूमदार यांनी ट्विट करत या याबाबत माहिती दिली.

त्या आपल्या ट्विट मध्ये म्हणाल्या की, माझे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी एक आकडा वाढला आहे. माझ्यामध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत आणि मला आशा आहे की या लक्षणांमध्ये अधिक बदल न होता माझ्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल.
किरण मजूमदार शॉ हे कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठे नाव असून त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
दरम्यान, कर्नाटक राज्यात सोमवारी 6,317 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 115 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 33 हजार 283 वर पोहोचली आहे. तर आता पर्यंत 1 लाख 48 हजार 562 रुग्णांची प्रकृती सुधारली असून आता पर्यंत 4,062 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.