प्रतिनिधी/ दापोली
बंगालच्या उपसागरात 11 जून रोजी नव्याने निर्माण होणाऱया कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोकणामध्ये 14 जून रोजी अतिवृष्टी होणार असल्याची माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिली.
शिवाय या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोकणात पाऊस घेऊन येणारे नैऋत्य मोसमी वारे हे वेगाने जमिनीकडे खेचले जाणार आहेत. यामुळे कोकणात 14 जून रोजी 200 मि. मी.पर्यंत जोरदार अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळी वाऱयाचा वेग 25 कि. मी. प्रतितासपर्यंत पोहोचू शकतो. 11 तारखेला निर्माण होणाऱया या कमी दाबाच्या पट्टय़ाचा वेग जर जास्त असेल तर 14 तारखेच्या आधीच कोकणात अतिवृष्टी येऊ शकते. मात्र या कमी दाबामुळे निर्माण होणाऱया वाऱयाचा वेग कमी असेल तर 14 तारखेला कोकणात अतिवृष्टी होणार आहे. शिवाय हा कमी दाबाचा पट्टा 11 जूननंतर समुद्रातून जमिनीकडेही सरकणार आहे. याचा कोकणातील पर्जन्यमानावर थेट परिणाम होणार असल्याची माहितीही विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिली…