सैफ अली खान अन् राणी मुखर्जीची जोडी
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बंटी और बबली 2’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सुमारे 12 वर्षांनी सैफ आणि राणी एकत्र काम करत आहेत. टीझरमध्ये याची माहिती देखील देण्यात आली आहे. याचबरोबर चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी यासारखे नवे कलाकार दिसून येणार आहेत.

बंटी और बबली 2 च्या टीझरच्या प्रारंभी राणी आणि सैफ अली खान दोघेही स्वतःच्या लुकचा टचअप करताना दिसून येतात. टीझरमध्ये दोघांची जोडी अत्यंत आकर्षक वाटते. या चित्रपटाचे निर्माते राणी मुखर्जीचे पती आदित्य चोप्रा हे आहेत. तर दिग्दर्शक म्हणून वरुण व्ही. शर्मा हे जबाबदारी सांभाळत आहेत. बंटी और बबली या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांनीच काम केले होते. या चित्रपट चांगलाच गाजला होता. बंटी और बबली 2 हा त्याच पठडीतील नवा चित्रपट असणार आहे.