किंमत 1 लाख 40 हजार : ई-20 इंधनावरही धावणार
वृत्तसंस्था/ मुंबई
दुचाकी निर्मिती कंपनी बजाज ऑटोने आपल्या नव्या पल्सर 220 एफ या सुधारित दुचाकीचे लाँचिंग केले आहे. सदरच्या गाडीची किंमत (एक्स शोरुम) 1 लाख 40 हजार इतकी असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही दुचाकी ई-20 इंधनावरही धावू शकणार आहे.

जुन्या मॉडेलच्या तुलनेमध्ये नव्या गाडीची किंमत तीन हजार रुपये अधिक आहे. सदरच्या गाडीचे वितरण कंपनीकडून करण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातील अधिकृत विक्रेत्यांकडे लवकरच सदरची नवी गाडी उपलब्ध केली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे. सदरची गाडी टीव्हीएस अपाचे आरटीआर 200 व बजाज पल्सर एफ 250 यांना टक्कर देईल. गाडीचा लूक मागच्या मॉडेलप्रमाणेच ठेवण्यात आला आहे.
कोणती वैशिष्ट्यो आहेत
220 सीसीचे सिंगल सिलेंडर, एअर कुल्ड फ्युल इंजेक्टेड इंजिन गाडीला देण्यात आले आहे. पाच स्पीड गिअर बॉक्ससह ही गाडी येणार असून ई-20 या इंधनावरही चालू शकणार आहे. फ्युएल लेव्हल इंडिकेटर, स्पीडोमिटर आणि 1 डिजिटल स्क्रीनही या गाडीत असणार आहे.