प्रतिनिधी /बेळगाव
बबन भोबे मित्रमंडळाच्या वतीने शहरातील विविध आश्रम व संस्थांना तेल, उठणे, साबण यासह दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला बेळगाव उत्तरचे आमदार ऍड. अनिल बेनके उपस्थित होते.
शहरातील नंदन मक्कळधाम, समृद्धी फौंडेशन, अळवण गल्ली शहापूर येथील फिजिकल हॅण्डिकॅप असोसिएशन, मराठी शाळा क्रमांक 22, कन्नड शाळा क्र. 9, बुढाप्पा घर येथील सदस्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. कल्लेहोळ येथील दहावीच्या परीक्षेत 98 टक्के गुण घेतलेल्या सुदर्शन बसवंत राक्षे याचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्याचा महाविद्यालयीन खर्च महेंद्र देशपांडे यांनी उचलण्याचा निर्णय घेतला. तर विनोद बामणे यांनी सहा महिने मोफत संगणक प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले.
मंडळाचे अध्यक्ष बबन भोबे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी ऍप्टेकचे संस्थापक विनोद बामणे, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे सदस्य डी. बी. पाटील, रमेश पवार, मनोहर शिरोडकर, मंदा नेवगी, महादेव सुरेकर, शंकर पावशे, रघुनाथ चव्हाण, ओमकार गावडे, विद्या पाटील, गिरीश सव्वाशेरी यांच्यासह इतर उपस्थित होते.