इचलकरंजी / प्रतिनिधी
बलात्काराच्या गुन्ह्यातील एका पिडीतीने संशयीत आरोपीला तुझ्या घरात घुसून आत्महत्या करतो. कुटुंबातील लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवितो अशी धमकी देऊन 1 लाखाच्या खंडणी मागणी केल्याची घटना येथे घडली आहे. याप्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत खंडणी मागणार्या पिडीत महिलेचा शोध घेऊन मंगळवारी दुपारी अटक केली आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, येथील लिंबु चौक परिसरात रशिद बाळासो मुजावर (वय 37) हा यंत्रमाग कारखानदार रहात आहे. याचे कबनुर परिसरात राहणार्या एका महिलेबरोबर ओळख झाली. या दरम्यान संबंधित महिलेने कारखानदार मुजावरसह त्याचा भाऊ आणि मित्रा विरूद्ध इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसात आणि बेळगाव जिल्ह्यातील (ता. चिक्कोडी) सदलगा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
या दोन्ही गुन्ह्यातील संशयीत सध्या जामिनावर सुटले असून दोन्ही गुन्हे सध्या न्यायप्रविष्ठ आहेत. असे असताना पिडीतीने तक्रार मिटवून घेतो असे भासवून इचलकरंजीतील वकीलाद्वारे अडीच लाख रुपये घेतले आणि न्यायालयात भा.द.वि. 164 प्रमाणे जबाब देखील दिला आहे. त्यानंतर पुन्हा संबंधित पिडीतीने मुजावर याच्याकडे 25 लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली. या खंडणीचे पैसे दिले नाहीत म्हणून पिडीतीने न्यायालयात रिटपिटीशन दाखल केली. त्यानंतर त्याला तुझ्या वडीलांना आणि भावाला पुन्हा गुन्ह्यात अडकवतो अशी धमकी दिली. याला घाबरून त्याने 96 हजार रुपयांची खंडणी दिली.
पुन्हा गुन्ह्यात अडकवण्याची भिती दाखवून पिडीत महिलेने 60 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली असता 1 लाख 70 हजार रुपयांची खंडणी दिली. सोमवार दि. 14 डिसेंबर रोजी संबधित पिडीतीने कारखानदार मुजावर याच्या घरात घुसून 1 लाख रुपयांची मागणी केली. खंडणीची रक्कम न दिल्यास घरात आत्महत्या करण्याची धमकी देत तुझ्या कुटुंबातील लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवितो अशी धमकी दिली. याप्रकरणी मुजावर याने संबंधित पिडीत महिलेच्या विरूद्ध शिवाजीनगर पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंद केली आहे. या तक्रारीची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन मंगळवारी दुपारी पिडीतेचा शोध घेऊन अटक केली आहे.
Previous Articleअभिनेत्री तापसी पन्नूसोबत धावणार सांगलीची रसिका माळी
Next Article सेकंद हँड कपडे खरेदी करताना….
Related Posts
Add A Comment