सीबीटीमधील प्रकार : खासगी इस्पितळात उपचार सुरू

प्रतिनिधी /बेळगाव
ग्रामीण भागात जाणाऱया बसचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आहे त्या बसमध्ये चढण्यासाठी लागलेल्या चढाओढीत बसची धडक बसून एक विद्यार्थी व वृद्ध जखमी झाले. बुधवारी सीबीटी परिसरात ही घटना घडली.
सुळेभावी बसमध्ये (केए 42, एफ 495) चढताना ही घटना घडली आहे. वैभव महादेव पाटील (वय 15, रा. मारुती गल्ली, मुतगा), गणपती कल्लाप्पा पाटील (वय 70, रा. लक्ष्मी गल्ली, इदलहोंड) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. वैभव हा ठळकवाडी हायस्कूलचा विद्यार्थी असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. बसच्या फेऱया कमी व प्रवाशांची संख्या जास्त यामुळे बसमध्ये चढण्याच्या चढाओढीत ही घटना घडली आहे. यासंबंधी वाहतूक उत्तर विभाग पोलिसांशी संपर्क साधला असता अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.