सांबरा
बसवण कुडची येथे मंगळवारी होणाऱया श्री मरगाईदेवीच्या मूर्तीची प्रति÷ापना आणि कळसारोहण कार्यक्रमानिमित्त रविवार दि. 6 रोजी सकाळपासून गावामध्ये मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
नागेश स्वामी दिवटे यांच्या घरापासून मिरवणुकीला सुरवात होणार आहे. बसवण कुडची येथील देवराज अर्स कॉलनीमध्ये असलेल्या जुन्या प्राचीन मरगाई मंदिराचा जीर्णोद्धार करून आकर्षक मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराचा मंगळवारी कळसारोहण, गृहप्रवेश व वास्तुशांती होणार आहे. त्यानिमित्त रविवारी सकाळी देवीच्या मूर्तीची गावात वाजत गाजत व भंडाऱयाची उधळण करत मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळवारी मंदिराची वास्तुशांती व गृहप्रवेश करून मूर्ती प्रति÷ापना होणार आहे, मंगळवारी सकाळी विधिवत पूजा, होमहवन होणार आहे. मरगाई देवीच्या मंदीर जीर्णोद्धाराचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.
मंगळवारी सकाळी 6 ते 7 मंदिराची वास्तुशांती, होमपूजन झाल्यानंतर सकाळी 7 ते 9 श्री मरगाई देवीच्या मूर्तीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रति÷ापना करण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पूजा करून महाप्रसादाला प्रारंभ होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे मंदिराचे अध्यक्ष आप्पुनी चौगुले, उपाध्यक्ष चौगले व बसवण कुडची मंदीर पंच कमिटीच्यावतीने कळविण्यात आले आहे.