वार्ताहर /सांबरा
बसवन कुडची येथे रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत वाजतगाजत व भंडाऱयाची उधळण करत मरगाई देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 10 वाजता येथील नागेश स्वामी दिवटे यांच्या घरापासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ‘ऊदं गं आई ऊदं’ च्या जयघोषात व भंडाऱयाची उधळण करून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मेन रोड, विद्यानगर, गांधी गल्ली, तानाजी गल्ली, विठ्ठल रखुमाई गल्ली, नवी गल्ली, नागदेव गल्ली, शिवाजी गल्ली, गांधी गल्ली, बसवणा गल्ली, बस्ती गल्ली मार्गे जात शेवटी श्री कलमेश्वर बसवेश्वर मंदिरसमोर मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
मूर्ती देवराज अर्स कॉलनी येथील सिद्धिविनायक मंदिरात ठेवण्यात आली. मूर्तीची गल्लोगल्ली व घरोघरी आरती करण्यात आली. गावातील दोन हजार महिला डोक्मयावर कलश घेवून मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
मंगळवारी होणाऱया श्री मरगाईदेवीची मूर्ती प्रति÷ापना व कळसारोहण कार्यक्रमानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. गावकऱयांच्या हस्ते पूजा करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार अनिल बेनके, नगरसेवक बसवराज मोदगेकर, माजी नगरसेवक बसवंत हलगेकर, मंदिराचे अध्यक्ष अपुनी चौगुले, उपाध्यक्ष अनिल चौगुले, नागेश स्वामी दिवटे आणि गावकरी मोठय़ा संख्येने उपस्थित
होते.बसवन कुडची येथील देवराज अर्स कॉलनीमध्ये असलेल्या जुन्या प्राचीन मरगाई मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिराचा कळसारोहण, गृहप्रवेश व वास्तुशांती कार्यक्रम मंगळवार दि. 8 रोजी करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी विधिवत पूजा, होमहवन होणार आहे. सकाळी 6 ते 7 मंदिराची वास्तुशांती, होमपूजन होवून सकाळी 7 ते 9 श्री मरगाई देवीच्या मूर्तीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रति÷ापना करण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पूजा करून महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे बसवण कुडची मंदिर पंच कमिटीच्यावतीने कळविण्यात आले आहे.