झाडांनी येथील उत्सवात तीन हजार भाविकांनी घेतला सहभाग : सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमानी भाविकांनी केला जागर,मासोर्डे, ठाणे येथे महाशिवरात्री उत्सव साजरा
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील विविध भागात महाशिवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. अभयारण्याच्या परिक्षेत्रात येत असलेल्या झाडांनी बसवेश्वर मंदिरात यावेळी सुमारे तीन हजार भाविकांनी दर्शन घेऊन उत्सवामध्ये सहभाग दर्शविला. गेल्या काही वर्षांपासून सदर ठिकाणी महाशिवरात्र उत्सव साजरा करण्याची वेगळी परंपरा रुढ झालेली आहे. वर्षानुवर्षे याला वाढता प्रतिसाद लाभत असून विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यावषी पूर्ण रात्र भर जागर करुन महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.
ठाणे मासोर्डे आदी ठिकाणीही महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेऊन उत्सव भक्तिभावाने साजरा केला. मासोर्डे येथे सकाळपासून श्रीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे त्याठिकाणी असे तीर्थ स्थानावर भाविकांनी स्नान करून अभिषेक केला. ठाणे सत्तरी येथील देवस्थानांमध्ये अशा प्रकारची गर्दी पाहायला मिळाली.
झाडांनी भागात भाविकांची अलोट गर्दी
सावर्डे पंचायत क्षेत्रात येत असलेल्या झाडांनी या गावांमध्ये गेल्या काही वर्षापासून बसवेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सवानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पूर्ण दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते. महाशिवरात्र उत्सवाच्या पूर्वदिनी मंदिराच्या प्रांगणात अक्षरशः भाविकांची गर्दी पहावयास मिळाली. यावेळी सुमारे तीन हजारांच्या आसपास भाविकांनी उपस्थिती लावून देवदर्शनाचा लाभ घेतला.