मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
डिचोली. प्रतिनिधी
असंघटीत तसेच कोणत्याही सोयीविना काम करण्राया कामगार घटकाला कामाचे संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या ई श्रम कार्ड योजनेचा लाभ या कामगारांना ब्रयाचपैकी होणार आहे. भविष्यात बांधकाम क्षेत्रात काम करण्राया मजुरांना बांधकाम कल्याण बोर्डच्या खाली हि ई श्रम कार्डे त्यांनाही दिली जाणार आहे. म्हणजेच केंद्र सरकारच्या या कार्डमार्फत असलेल्या योजना आणि कामाचे संरक्षण या मजुरांनाही लाभणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी रवींद्र भवनात केले.
मजूर आयोगामार्फत करण्यात आलेल्या 170 मजुरांना ई श्रम कार्डांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम रवींद्र भवनात पार पडला यावेळी मजुर आयोगाचे अधिक्षक आग्नेलो, सहाय्यक मजूर अधिक्षक गिरीश पेडणेकर व इतरांची उपस्थिती होती.
या ई श्रम कार्डद्वारे लाभार्थींना विमा, पेंशन यासारख्या सुविधा मिळणार.आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना आज सामान्य जनतेसाठी लाभदायी ठरलेल्या आहेत. जन धन खाते योजनेचे महत्त्व कोवीड माहमारीच्या वेळी समजले. तसेच इतरही योजनांची माहिती करून घेत त्या मिळविण्यासाठी आपल्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
यावेळी मुख्य मजूर अधिक्षक आग्नेलो यांनी हि योजना तसेच इतरही योजना लोकांच्या भल्यासाठी असून त्यांचा जास्तीत जास्त लाभ उठवावा, असे आवाहन केले.