बांदा/प्रतिनिधी-
पूरस्थिती पुरात अडकलेल्याना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बांदा ग्रामस्थ आपत्ती व्यवस्थापनाची वाट न पाहता स्वतःला झोकून देत काम करतात.त्यात लाईफ जॅकेटची कमतरता भासते. पूरस्थिती ओढवल्यास लाईफ जॅकेट सहज उपलब्ध व्हावीत म्हणून बाबा काणेकर यांच्याकडून बांदा ग्रामपंचायत 10 लाईफ जॅकेट सरपंच अक्रम खान यांचेकडे आज देण्यात आली.बांदा गावात आलेल्या भीषण पूर आणि त्यात लोकांचे झालेले हाल आणि लाईफ जॅकेटच्या अभावामुळे बचाव कार्यात येणारे अडचणी पाहता आपण जॅकेट दिल्याचे बाबा काणेकर यांनी सांगितले. यावेळी जि प सदस्या श्वेता कोरगावकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, प्रियंका नाईक आदीसह कर्मचारी उपस्थित होते