प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी संघटना आणि वाणिज्य शिक्षक व पदवीधर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेमध्ये बाबुराव ठाकुर पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या स्पर्धेत बेळगावसह आसपासच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सामान्य वाणिज्य विषयात हर्षदा डांगे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. तर विनायक बेन्नाडी याला उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले. सामान्यज्ञान स्पर्धेत हर्षदा डांगे आणि शुभम कांबळे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविली. या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून महाविद्यालयाचे संचालक मंडळ, प्राचार्य, प्राध्यापकांचे त्यांना प्रोत्साहन मिळत आहे.