बेंगळूर : कोरोना परिस्थितीमुळे राज्यातील बारावी विद्यार्थ्यांना परीक्षेविना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांचे निकाल ग्रेड स्वरुपात जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता गेड नव्हे; तर गुणांच्या स्वरुपात निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालिका स्नेहल यांनी दिली आहे.
जूनच्या शेवटच्या आठवडय़ात निकाल घोषित करण्याची तयारी आहे. बारावीचा निकाल ग्रेड स्वरुपात प्रसिद्ध केल्यास विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी यापूर्वी ज्या प्रकारे निकालपत्रक तयार केले जात होते, त्याप्रमाणेच यावेळीही निकालाची घोषणा केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.