सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९९. ६० टक्के
ओरोस/ प्रतिनिधी –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचा बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९९. ६० टक्के लागला आहे. यावर्षीही मुलींचा टक्का वर राहिला आहे.