प्रतिनिधी / बार्शी
बार्शी शहर आणि वैराग शहर या दोन शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने आता सोलापूर शहराच्या ही पेक्षा जास्त कडक लॉकडाऊन बार्शी शहर आणि वैराग शहर या दोन शहरांमध्ये राबविण्यात येणार असून हा लॉकडाऊन म्हणजे नागरिकांच्या काळजीसाठी घेण्यात आलेला आहे. नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी केली आहे याबाबत सविस्तर आदेश दिनांक 14 रोजी संध्याकाळपर्यंत पारित होतील असेही सांगितले. यावेळी तहसीलदार प्रदीप शेलार, बार्शी नगर परिषद मुख्याधिकारी कुंभार, पोलीस उपाधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे, बार्शी शहर पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, बार्शी तालुका पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, बार्शी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जोगदंड व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
याबाबत सविस्तर बोलताना प्रांताधिकारी निकम यांनी सांगितले की, या वेळी होणारा लॉकडाऊन हा कडक होणार असून यासंदर्भात आज दिनांक 13 रोजी सकाळपासून विविध प्रशासन यंत्रणा यांच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक बार्शी तहसील कार्यालय या ठिकाणी घेतली आहे. या वेळी त्यांनी सांगितले की सर्व विभागांना सूचना दिल्या आहेत यात बार्शी शहरातील दवाखाने या लॉकडाऊन काळात पूर्ण क्षमतेने चालू असतील जर कोणी दवाखाना बंद केला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. बार्शी आणि वैराग शहरातील सर्व मेडिकल दुकाने चालू असतील मात्र त्यांना आदेश देण्यात येणार आहेत की डॉक्टरांच्या सल्ल्यानेच चिठ्ठीशिवाय कोणत्याही रुग्णाला औषध देऊ नये आणि आपल्याकडे गंभीर आजाराबाबत औषध घेण्यात येणाऱ्या नागरिकांची यादी करावी. या लॉकडाऊन काळात कोरोना बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग परिणामकारकपणे केले जाणार असल्याची माहिती दिली आहे तर या काळामध्ये कोणत्या सुविधा चालू आणि कोणत्या बंद असणार याबाबतचे स्पष्ट आदेश उद्या दिनांक 14 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत निर्गमित करण्यात येतील अशी माहिती प्रांताधिकारी यांनी दिली आहे.
Previous Articleराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यभर काम करावे
Next Article अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती स्फोट; जवळपास 43 जण जखमी
Related Posts
Add A Comment