वृत्तसंस्था/ माद्रीद
रविवारी येथे झालेल्या ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात बार्सिलोनाने व्हिलारेलचा 4-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात बार्सिलोनाच्या मेस्सीने गोल नोंदविला.
गेल्या काही दिवसांपासून बार्सिलोना संघाचे प्रशिक्षक कोमेन आणि लायोनेल मेसी यांच्यात मतभेद विकोपाला गेल्याने मेस्सीने बार्सिलोनाचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या ट्रान्स्फर वादग्रस्त प्रकरणानंतर हा त्याचा पहिला सामना होता. रविवारच्या सामन्यात मध्यंतराला 10 मिनिटे बाकी असताना मेस्सीने स्पॉट कीकवर बार्सिलोनातर्फे गोल नोंदविला. तत्पूर्वी बार्सिलोनाचे खाते 17 वर्षीय फेटीने उघडले. बार्सिलोनातर्फे गॅस्परने गोल केला. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात ऍटलेटिको माद्रीदने ग्रेनेडाचा 6-1 असा एकतर्फी पराभव केला. ऍटलेटिको माद्रीद संघात प्रवेश केल्यानंतर पहिल्याच सामन्यात सुवारेझने दोन गोल नोंदविले.