प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालयात नौदल एनसीसी शाखेचे उद्घाटन करण्यात आले. मागील 33 वर्षांपासून सेंट पॉल्स, सेंट मेरी या दोन हायस्कूलमध्ये नौदल एनसीसी युनिट सुरू होते. आता बालिका आदर्श विद्यालयातही 8 कर्नाटक नौदल एनसीसी युनिट सुरू करण्यात आले आहे. 8 कर्नाटक नौदल युनिटचे कमांडिंग ऑफिसर सत्यनाथ भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सत्यनाथ भोसले यांच्या हस्ते एनसीसी बॅनरचे अनावरण करण्यात आले. कमांडर भोसले हे बेळगावचे असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे युनिट स्थापन करणे सोयीचे ठरले. त्यांनी शाळेचे कौतुक करत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ट्रूप कमांडर विश्वास गावडे यांनी केले. शाळेतर्फे कमांडिंग ऑफिसर सत्यनाथ भोसले यांचा सत्कार शाळेचे चेअरमन जी. एन. फडके यांनी केला. संचालक मंडळातर्फे प्रा. आनंद गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती चिंचणीकर यांनी केले. मुख्याध्यापक एन. ओ. डोनकरी यांनी आभार मानले. 8 कर्नाटक नौदल एनसीसीचे कर्मचारी यल्लाप्पा बिरादार, विजय पार्लेकर, उमेश बेळगुंदकर यांचे सहकार्य मिळाले.