जगभरात चर्चेत असणारा, प्रत्येक पर्वामधून प्रेक्षकांना नवीन अनुभव देणारा, करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस’… कलर्स मराठीवर बिगबॉस मराठीच्या दोन्ही पर्वांना अभूतपूर्व यश मिळाले आणि जेव्हा कार्यक्रमाचा नवा टिझर वाहिनीवर दिसला तेव्हापासून या कार्यक्रमबद्दलच्या बऱयाच चर्चा पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या. मग तो बिगचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोटय़ा मोठय़ा गोष्टी वा किस्से वा बिग बॉस मराठीचे घर असो. महेश मांजरेकर यांचे सूत्रसंचालन, कार्यक्रमातील सदस्य, त्यांची भांडण, त्यांची दोस्ती – यारी, नॉमिनेशन प्रक्रिया, कॅप्टनसी, टास्क या सगळय़ा गोष्टींनी प्रेक्षकांची मने जिंकली… आता हे घर सज्ज आहे आपलं मनोरंजन करण्यासाठी… पुन्हा एकदा ते घर येत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एंटरटेनमेंट अनलॉक करायला 19 सप्टेंबरपासून आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. बिग बॉस मराठीच्या तिसऱया पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असून त्यांनी नुकतेच या कार्यक्रमाच्या प्रोमोचे शूट संपवले. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक खूप उत्सुक आहेत या कार्यक्रमाच्या नव्या सिझनसाठी. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील या विषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे. तेव्हा लवकरच कळेल कोण कोण असणार आहेत या सिझनमधील सदस्य, कसे असणार या वेळेसचं घर.
Previous Article20 वर्षांमध्ये 350 विमानांची खरेदी करणार
Next Article फाशीचा वड स्मारकास विद्रोहींकडून अभिवादन
Related Posts
Add A Comment