निवासस्थानी उभारलेल्या मंडपामध्ये विवाह संपन्न : मोजकेच निमंत्रित उपस्थित
बेळगाव /प्रतिनिधी
बेळगावची कन्या व मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकुर सोमवारी बेळगाव मुक्कामी तीर्थदीप रॉय यांच्याशी विवाहबद्ध झाली. सई ही वीणा व अजित लोकुर यांची कन्या असून त्यांच्या निवासस्थानी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये सकाळी 9.48 च्या मुहूर्तावर हा विवाह पार पडला. यावेळी कोविड-19 च्या नियमांचे पालन करत फक्त मोजकेच निमंत्रित उपस्थित होते.
फुलांनी सजविलेल्या आच्छादनातून सई विवाह मंडपात आली. तेथे वीणा आणि सईच्या मैत्रिणींनी नृत्याच्या तलावर व लेझीमच्या ठेक्मयावर तिला विवाह वेदीपर्यंत नेले. सईने खास मराठमोळा पोशाख म्हणजे नऊवारी परिधान केली होती. गुरुजी नारायण व्हन्नंगी व सागर कुलकर्णी यांनी पौरोहित्य करून विवाह सोहळय़ाचे विधी पूर्ण केले. सईची मावशी कविता गाडगीळ यांनी मंगलाष्टक म्हंटले.
अक्षतारोपण झाल्यानंतर सईने व तीर्थदीपने उखाणा घेतला. वीणा व अजित लोकुर यांनी कन्यादान केले. या विवाह सोहळय़ास तीर्थदीपच्या आई रमा, बहीण शंपा, मामा अरुण प्रकाश बिस्बास, मामी मीनाक्षी, भाचा सव्यसाची, मित्र आयन व अभिषेक तसेच लोकुर कुटुंबीयांचे आप्तस्वकीय उपस्थित होते. मराठी बिग बॉस फेमची विजेती मेधा धाडे कन्या साचीसह या विवाह सोहळय़ाला आवर्जून उपस्थित होत्या.
सईसह आम्ही सर्वांनी लग्नाचा आनंद घेतला- मेधा धाडे
या सोहळय़ाबद्दल बोलताना मेधा धाडे म्हणाल्या, सईचे लग्न ठरल्यापासून बेळगावला लग्नाला येण्याची उत्सुकता होती. दोन दिवसांपासून मी बेळगावमध्येच असून, सईचा मेहंदी सोहळा, हळद, सीमांत पूजन या सगळय़ा सोहळय़ांना मी उपस्थित राहिले. सोमवारी सईचे लग्न झाले. सईसह आम्ही सर्वजणांनी या लग्नाचा आनंद घेतला. सई मला लहान बहिणीसारखी आहे. बहिणीच्या लग्नामध्ये जशी लगबग असते तशीच मी येथे अनुभवली. बिग बॉसमधील आमची मैत्रिण शर्मि÷ा राऊत ही या सोहळय़ाला उपस्थित राहणार होती. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ती येवू शकली नाही. तसेच बिग बॉसमधील अन्य कलाकारही उपस्थित राहणार होते. मात्र त्यांना कोविडमुळे उपस्थित राहता येत नाही. तथापि त्या सर्वांच्यावतीने मी सई आणि तीर्थदीप यांचे अभीष्टचिंतन करते.