लडाख अन् अरुणाचलमध्ये सर्वाधिक प्रकल्प ः चीनसोबतच्या तणावाची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वाढत्या तणावादरम्यान बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनने (बीआरओ) स्वतःच्या प्रकल्पांद्वारे ड्रगनला बॅकफूटवर ढकलले आहे. मागील दोन वर्षांमध्ये बीआरओने 200 हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. यातील सर्वाधिक प्रकल्प लडाख आणि अरुणाचल प्रदेशात पूर्ण करण्यात आले आहेत. ही दोन्ही क्षेत्रे सामरिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
सरकारने बीआरओवर अधिक विश्वास दर्शविला आणि आर्थिक तरतुदीत वाढ केली. नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि कार्यशैलीतील बदलामुळे जलदपणे प्रकल्प पूर्ण करता आले आहेत. 2021 मध्ये 102 प्रकल्प (87 ब्रिज आणि 15 मार्ग) तर 2022 मध्ये 103 प्रकल्प (67 ब्रिज, 30 मार्ग आणि 6 हेलिपॅड) तयार झाले आहेत, अशी महिती बीआरओचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी दिली आहे.
मागील दोन वर्षांमध्ये 5125 कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. 22 टक्के प्रकल्प लडाख आणि 30 टक्के अरुणाचलमधील आहेत. सध्या अरुणाचलमध्ये 4 तर लडाखमध्ये 3 प्रकल्पांवर काम सुरू आहे. अरुणाचलमध्ये 6, जम्मू-काश्मीरमध्ये 4 आणि लडाखमध्ये 1 भुयारी मार्ग तयार केला जातोय. बीआरओ सध्या 11 भुयारी मार्गांवर काम करत असून यातील 9 भुयारांचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
सर्वप्रकारच्या निर्मितीवर आमचा भर आहे. लडाखमध्ये 19 हजार फुटांवर जगातील सर्वात उंच रस्ता यार केला आहे. डीएसडीबीओच्या ऑलटरनेट कनेक्टिव्हीवर मोठय़ा प्रमाणात काम करत आहोत. श्योक ब्रिज तयार झाल्याने सहजपणे रणगाडे सीमेपर्यंत पोहोचू शकतील. फ्लॅग हिल डोकालामध्ये क्लास 70 ब्ा्रिज तयार करण्यात आला आहे. मनालीहून सरचूमार्गे लेहपर्यंत जाणाऱया मार्गावर तीन मोठय़ा खिंडी लागतात, यातील बारलाचला खिंडीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित दोन्ही खिंडींचे सर्वेक्षण लवकरच पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले आहे.
यांगत्सेपर्यंत रस्ता तयार
डोकलाम फ्लॅम हिलवर मॉडय़ुल ब्रिज तयार करण्यात आला आहे. डोकलामपर्यंत रस्ता तयार केला असून आता सैन्य जलदपणे तेथे पोहोचू शकते. अरुणाचलमध्ये 4 भुयारी मार्गांवर काम सुरू आहे. चीनला स्वतःच्या हद्दीतून रस्ता करणे सोपे ठरते, परंतु आमच्या भौगोलिक स्थितीमुळे रस्ता तयार करणे आव्हानात्मक आहे. सर्व आव्हानांवर मात करत आम्ही वेगाने रस्त्यांची निर्मिती करत आहोत. आम्ही यांगत्सेपर्यंत रस्ता तयार केला असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकच्या भागांपर्यंत रस्तेनिर्मिती करत आहोत असे चौधरी यांनी सांगितले आहे.