बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) ने एक हॉटेल भाड्याने घेत तिथे मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु केले आहे. बीएमआरसीएलने कर्मचारी आणि बांधकाम कामगारांसाठी १०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. गुरुवारी हे कोविड केअर सेंटर सुरु केले. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बीएमआरसीएलने हे कोविड केअर सेंटर सुरु केलं आहे. केंद्रात आतापर्यंत १७ कर्मचार्यांना दाखल करण्यात आले आहे, असे बीएमआरसीएलने सांगितले.
राज्यात कोरोना रुग्णांची सांख्य वाढत असताना अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नसल्याच्या घटना समोर येत आहेत. यापार्श्वभूमीवर बीएमआरसीएलने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला.