धारवाड विभागीय केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागिय क्रिकेट संघटना आयोजित धारवाड विभागिय केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून हुबळी क्रिकेट अकादमी अ संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाचा 377 धावाने, अमृत पोतदार सीसीआय संघाने बीडीके स्पोर्ट्स हुबळी सी संघाचा 74 धावांनी, बीडीके धारवाड अ संघाने युनियन जिमखाना संघाचा 325 धावानी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. सुशांत एस. के., राहुल रावत, अनिरूद्ध जोशी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए बेळगाव मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात अमृत पोतदार सीसीए संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी बाद 300 धावा केल्या. त्यात वैभव कुरीबागीने 70, रवीचंद्र उकळीने 48, सुशांत एस. के. ने 47, रोहित पाटीलने 43, शिवप्रकाश हिरेमठने 40, नागराजने 22 धावा केल्या. बीडीके हुबळी तर्फे शेखर शेट्टीने 3, तर दीपक प्रिय व देवेश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीडीके सी. संघाचा डाव 43.3 षटकात 226 धावात आटोपला. त्यात प्रिया राजनने नाबाद 111, शेखर शेट्टीने 43, भारतने 21 धावा केल्या. अमृत पोतदार सीसीआयतर्फे सुशांत एस. के. ने 54 धावात 4, रवी उकलीने 2, सुमीत व नागराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 3 गडी बाद 510 धावांचा डेंगर रचला. त्यात सलामीवीर चिराग नायकने 8 षटकार 19 चौकारासह 181 तर राहुल रावतने 17 षटकार 13 चौकारासह केवळ 97 चेंडूत नाबाद 202 धावा तर सुधन्वा कुलकर्णीने 57 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे आदर्श माळीने 2, हर्ष पटेलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाचा डाव 31.3 षटकात 133 धावात आटोपला. त्यात आदर्श माळीने 35, काविषने 21, धृव देसाईने 18, हर्ष पटेलने 15 धावा केल्या. हुबळी तर्फे प्रणव भाटीयाने 4, विठ्ठल हबीबने 3, डॉम्निक फर्नांडिसने 2, तर आकाश पत्तारने 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात बीडीके अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी बाद 490 धावा केल्या. त्यात अनिरूद्ध जोशीने 5 षटकार 12 चौकारासह 172 धावा करून शतक झळकाविले. त्याला प्रथमेश साळुंकेने 79, सौरव सामंतने 64, कृष्णा बागडीने 49 धावा केल्या. जिमखानातर्फे सावीद मलीकने 97 धावात 3, वैष्णव संघमित्र, गौसपीर हाजी, शिवानंद पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाचा डाव 33.5 षटकात 175 धावात आटोपला. त्यात वैष्णव संघमित्राने 69, अविद मलिकने 37 धावा केल्या. बीडीके तर्फे सामंतने 3, शोहेब मॅनेजर ओझा यांनी प्रत्येकी 2, तर फरहान पाटील व बाडगी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.