किणये : वाघवडे येथील कृषी पत्तीन सोसायटीतर्फे सीमाभागातील ज्ये÷ नेते व माजी आमदार बी. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सोसायटीच्या सभागृहात शोकसभा आयोजिली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एपीएमसी सदस्य आर. के. पाटील होते. प्रारंभी बी. आय. पाटील यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन के. के. पाटील व जोतिबा आंबोळकर यांनी केले. यानंतर दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या आमदारकीच्या वीस वर्षाच्या कालावधीत ते सर्वांशी अगदी मनमोकळेपणाने बोलायचे शेतकऱयांच्या हितासाठी लढणारे समितीचे ते झुंजार नेते होते. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा एकच ध्यास होता. सीमाप्रश्नाची सोडवणूक असे मनोगत आर. के. पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी एम. टी. आंबोळकर व सोमाण्णा नाईक यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. यावेळी सोसायटीचे चेअरमन नारायण पाटील, बंडू गुरव, कल्लाप्पा पाटील, रघुनाथ देसाई, नागनाथ बुवाजी, कृष्णा गुरव, नागेशी आंबोळकर, राजू दिवटगे, राहुल आंबोळकर, जोतिबा कृष्णा आंबोळकर, कुंदन आंबोळकर, गजानन आंबोळकर, इराप्पा आंबोळकर, लखन गोरल आदी उपस्थित होते.
Previous Articleवनखात्याचे बसवराज पाटील यांचा पर्यावरणप्रेमींकडून सत्कार
Related Posts
Add A Comment