बेळगाव : बुडाच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सोमवारी आयोजित करण्यात आलेली बैठक कोरमअभावी पाचव्यांदा रद्द झाली. कणबर्गी रहिवासी योजना तसेच अर्थंसंकल्पाला मंजुरी देण्यासह विकासकामे राबविण्यासाठी बैठक आयोजित केली होती. पण अध्यक्ष घुळाप्पा होसमनी, आमदार सतिश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर वगळता बैठकीला कोणीच हजर राहिले नसल्याने कोरम झाले नाही. परिणामी पाचव्यांदा बैठक रद्द करण्यात आली. बुडा कार्यालयाचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात मंजूर केला जातो. पण आतापर्यंत चार बैठका कोरम अभावी रद्द झाल्या होत्या. सोमवार दि. 11 रोजी पाचव्यांदा बैठक आयोजित करण्यात आली होती. पण ही बैठकदेखील कोरमअभावी रद्द करण्यात आली. त्यामुळे अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली नाही. बैठकीला किमान नऊ सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे.पण बैठकीला अध्यक्षासह काँग्रेसच्या आमदारांनी हजेरी लावली होती. पण अन्य भाजप आमदार व सरकार नियुक्त सदस्यांनी पाठ फिरविल्याने बैठक झाली नाही. बैठकीत कणबर्गी वसाहत योजनेसह अर्थसंकल्प व विविध विकासकामे राबविण्याबाबत चर्चा करण्यात येणार होती. पण बैठक झाली नसल्याने सर्व विषय प्रलंबित राहिले आहेत.
Previous Article‘वॉक मोअर-रेस्टलेस’वॉकरूचे नवे कॅम्पेन
Next Article विकास कामांसंदर्भात आमदारांची आयुक्तांशी चर्चा
Related Posts
Add A Comment