वार्ताहर /हिंडलगा
बेळगाव तालुक्यातील 28 गावे बुडा कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यामध्ये गोजगे गावचादेखील समावेश केल्याने शेतकरी व ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गोजगे गावचा समावेश बुडा कार्यक्षेत्रात करण्यास विरोध दर्शविला जात आहे. गावातील शेतकरी बांधव आणि ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बुडामध्ये समावेश झाल्यास गावातील शेतकऱयांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागतील. या भीतीने ग्रामस्थांतून बुडा कार्यक्षेत्रात गावचा समावेश करण्यास विरोध हेत आहे. नुकताच झालेल्या बैठकीत गावाच्या हितासाठी आंदोलनाची दिशा ठरवून शासनाच्या निर्णयाविरोधात लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. बैठकीला निंगाप्पा भातकांडे, गुरुनाथ बामणे, बसवंत येळगे, यल्लाप्पा मेलगे, कल्लाप्पा नाईक, मारुती बामणे, भाऊराव बामणे, मधू शहापूरकर, लक्ष्मण मेलगे, रामा मेलगे, मिलिंद शहापूरकर, परशराम कणबरकर, ललित शहापूरकर, निरंजन अष्टेकर, अनंत कणबरकर, बाबू यळगे, संभाजी बामणे, परशराम चलवेटकर, परशराम मुंगारे, बाबू कोलते व ग्रामस्थ उपस्थित होते.