सक्रिय रुग्णांची संख्या 371 वर
प्रतिनिधी /बेळगाव
बुधवारी बेळगाव शहर व जिल्हय़ातील आणखी 57 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये एका बेळगाव तालुक्मयातील 33 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्या 28 जणांना वेगवेगळय़ा इस्पितळांतून घरी पाठविण्यात आले आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 79 हजार 79 इतकी झाली आहे. आतापर्यंत 77 हजार 821 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 371 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांत उपचार करण्यात येत आहेत. मृतांचा सरकारी आकडा 887 हून अधिक आहे. अद्याप 4 हजार 183 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे.
बुधवारी बेळगाव तालुक्मयात रुग्णसंख्या अधिक झाली आहे. मणगुत्ती, रामतीर्थनगर, हिंदवाडी, विजयनगर, फुलबाग गल्ली, बिम्स, सदाशिवनगर, अझमनगर, कलमेश्वरनगर, उज्ज्वलनगर, टिळकवाडी, रामनगर, विनायकनगर, गवळी गल्ली-बेळगाव, श्रीनगर, शिवबसवनगर, भांदूर गल्ली, शिवाजीनगर, राणी चन्नम्मानगर, महांतेशनगर, जाधवनगर, कॅम्प परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.