पंढरपूर प्रतिनिधी
देव दर्शन घेऊन गावाकडे परतणाऱ्या बुलेट व कंटेनरची समोरासमोर जोरात धडक झाल्याने (खर्डी ता. पंढरपूर) येथील तीन युवक ठार झाले आहेत. सदरची घटना शुक्रवारी दुपारी सांगोला – जत रोड वरील (सोनंद ता. सांगोला) येथील चव्हाण मळ्याजवळ घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की (खर्डी ता. पंढरपूर) येथील किरण सुधाकर गुजले, अक्षय आण्णासो मलमे, अजय शशिकांत मंडले हे तिघे जवळा येथे म्हसोबा दर्शन करून सांगोलकडे येत होते. सोनंद जवळ कंटेनर (एम.एच 46 ए.एफ) 1086 आणि बुलेट (एम.एच.13 बी.टी 4936) ची समोरासमोर धडक झाली. अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला. जखमी दोघांना जण दवाखान्यात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी मयत झाल्याचे घोषित केले. त्यातील किरण गुजले यांचे लग्न झाले होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, आई, वडील आहेत. अजय मंडले व अक्षय मलमे यांचं लग्न जमले होते. अजय मंडले हा आजोळी आजोबांजवळ राहत होता. तिघेही जिवलग मित्र होते. घडलेल्या घटनेमुळे खर्डी गावावर शोककळा पसरली आहे.