बेंगळूर/प्रतिनिधी
क्रिकेट बेटिंग रॅकेट प्रकरणात बेंगळूर पोलीस कॉन्स्टेबलचे नाव समोर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला निलंबित केले आहे.
डीसीपी (उत्तर) धर्मेंद्रकुमार मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी नंदिनी लेआऊट पोलिसांनी काही संशयितांना सट्टेबाज रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती, आणि तपासणी दरम्यान कॉन्स्टेबलचाही यात हात असल्याचे समोर आले होते.
धर्मेंद्रकुमार मीना यांनी दिलेल्या वृत्ताच्या आधारे निलंबित करण्यात आलेल्या शिवकुमार हवालदाराविरुद्ध बेंगळूर पोलिसांनी विभागीय चौकशी सुरू केली.