पुसेगाव / वार्ताहर :
खटाव येथील हुसेनपुर शिवारात बेकायदा बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्या आयोजकासह इतर चार जणांवर पुसेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खटाव जवळील हुसेनपूर शिवारात दि १८ रोजी बैलगाडा शर्यती सुरू असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी आयोजक गोरख शंकर बोर्गे तसेच इतर चार बैलगाडा(छकडा) चालक व मालक यांच्यावर भारतीय दंड संहिता व वन्य प्राण्यांना निर्दयतेने वागवणूक प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार सुधाकर भोसले तपास करत आहेत.