प्रतिनिधी / बेळगाव
बेकिनकेरे येथील श्री हनुमान मंडळाच्यावतीने शुक्रवार दि. 12 पासून जंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील गोजगा रोडवर सकाळी 8 वाजता ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते उद्घाटन होवून या शर्यतीला सुरुवात होणार आहे. या शर्यतीतील विजेत्यांना अनुक्रमे 25 हजार, 21 हजार, 18 हजार, 15 हजार, 12 हजार, 10 हजार अशी आकर्षक 16 बक्षीसे देवून गौरव केला जाणार आहे. हौशी बैलजोडी मालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान मंडळातर्फे करण्यात आले आहे. यावेळी बेकिनकेरे ग्रा. पंचायतीवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.