बेडुकही देतात प्रतिसाद
माणसांप्रमाणेच जीव-जंतूंच स्वतःची भाषा असते, पण माणूस ती समजू शकत नाही. पण आता ऑस्ट्रेलियातील एका प्राध्यापकाने बेडकांची भाषा समजत असल्याचे आणि त्यांच्याशी बोलत असल्याचा दावा केला आहे.
त्यांच्या या दाव्यामुळे प्रत्येक जण हैराण आहे, कारण माणसांसाठी प्राण्यांची भाषा समजणे आतापर्यंत शक्य झालेले नाही. बेडकांशी बोलत असल्याचा दावा करणाऱया प्राध्यापकाचे नाव मायकल महोनी असून ते जीवशास्त्राचे प्राध्यापक आहेत. 70 वर्षीय महोनी ऑस्ट्रेलियाच्या न्यूकॅसल विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱयावर एका तलावाजवळून जात बेडकांशी बोलतेवेळी महोनी यांना एका मुलासारखा अनुभव येतो. कधीकधी मला कामाचा विसर पडतो, कराण मी काही क्षणांसाठी बेडकांसोबत बोलू इच्छितो आणि हा अनुभव आनंद देत असल्याचे मायकल यांनी म्हटले आहे.
मायकल यांनी बेडकांचा तीव्र, कर्कश आणि आवाजाची नक्कल आणि तो समजून घेण्याचे प्राविण्य मिळविले आहे. ऑस्ट्रेलियात बेडकांच्या जवळपास 240 प्रजाती आहेत. पण यातील सुमारे 30 टक्के प्रजातींना हवामान बदल, जलप्रदूषण, अधिवास नष्ट होणे आणि अन्य धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. ऑस्ट्रेलियात उभयचर प्राण्यांचा अधिवास संरक्षित करण्यासाठी काम करण्यासह महिनो यांनी आनुवांशिक सामग्रीद्वारे बेडकांना विलुप्त होण्यापासून वाचविण्याकरता क्रायोप्रेजर्व्हेशन प्रक्रिया विकसित करण्यास मदत कली आहे.