बेडकिहाळ : येथील बेडकिहाळ पत्रकार संघाच्या पदाधिकाऱयांची निवड मावळते अध्यक्ष गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. अध्यक्षपदी अभिजित लठ्ठे तर उपाध्यक्षपदी राजू संकपाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी संघाचे संस्थापक कृष्णा आरगे म्हणाले, पत्रकार संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. समाजात कोणावर अन्याय होत असल्यास याविरोधात पत्रकारांनी एकत्रित येऊन आवाज उठविला पाहिजे. कोरोना काळातही पत्रकारांनी आपल्या जिवाची पर्वा न करता काम केल्याचे त्यांनी सांगितले. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱयांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विक्रम शिंगाडे, महावीर चिंचणे, कुमार संकपाळ, लीना संकपाळ आदी उपस्थित होते.
Previous Articleदहावी पुरवणी परीक्षेच्या मूल्यमापनास प्रारंभ
Next Article बागलकोट येथे 13 पासून प्रवेश परीक्षा
Related Posts
Add A Comment