प्रतिनिधी/ बेळगाव
पोलीस दलातील उत्तम सेवेबद्दल 19 जणांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. त्यामध्ये बेळगावच्या दोन जणांचा समावेश आहे. खडेबाजार पोलीस स्टेशनचे हवालदार शंकरराव मारूतीराव शिंदे व जिल्हा सशस्त्रदलाचे (डीएआर) एआरएसआय दस्तगिर मोहंम्मद हनिफ घोरी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. शंकरराव शिंदे यांनी गुन्हे तपासात दाखविलेल्या कर्तबगारीबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले आहे. याबद्दल या दोघांचे अभिनंदन होत आहे.

यापूर्वी बेळगावमध्ये काम केलेले व सध्या गुप्तचर विभागात कार्यरत असलेले बी. दयानंद यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.