डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांचा समावेश, दोघे जण दगावले
प्रतिनिधी /बेळगाव
शुक्रवारी जिह्यातील 304 जणांचा अहवाल पॉझिटिक्ह आला आहे. यामध्ये सरकारी व खासगी इस्पितळातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत बेळगाव शहर व उपनगरातील दोघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिह्यातील आतापर्यंतचा मृतांचा आकडा 297 वर पोहोचला आहे.
बेळगाव शहर व उपनगरांतील 145, ग्रामीण भागातील 18 असे एकूण बेळगाव तालुक्मयात 163 जणांचा अहवाल पॉझिटिक्ह आला आहे. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 19 हजार 700 चा आकडा पार झाला आहे. तर शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 204 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
आतापर्यंत 17 हजार 270 जण बरे झाले आहेत. सध्या 2 हजार 45 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. शुक्रवारी मृतांचा सरकारी आकडा 7 असला तरी 3 ते 4 दिवसांची आकडेवारी एकत्र करुन हा आकडा जाहीर करण्यात आला आहे. प्रत्यक्षात बेळगाव शहर व उपनगरातील दोघा जणांचा मृत्यू झाला आहे.
आंबेवाडी, हिंडलगा, मच्छे, सुळगा-येळ्ळूर, सोनोली, मुतगा, अगसगा, बिजगर्णी, म्हाळेनट्टी, तारिहाळ, कंग्राळी खुर्द, काकती, येळ्ळूर, आदर्शनगर-वडगाव, अनगोळ, गणेशपूर, ऑटोनगर, आझादनगर, बसवणकुडची, भाग्यनगर, भारतनगर-शहापूर, कॅम्प, फोर्ट रोड, मिलीटरी हॉस्पिटल, माधवपूर-वडगाव, महाव्दार रोड, हिंदवाडी, महांतेशनगर, माणिकबाग बोर्डींग, खंजर गल्ली, खासबाग परिसरात पॉझिटिक्ह रुग्ण आढळून आले आहेत.
शुक्रवारी मिलीटरी हॉस्पिटलमधील 15 हून अधिक जणांचा अहवाल पॉझिटिक्ह आला आहे. फुलबाग गल्ली, फोर्ट रोड, मुत्यानट्टी, गुरुप्रसाद कॉलनी, हिंदूनगर-टिळकवाडी, जेएनएमसी कॅम्पस, रानडे रोड-टिळकवाडी, सह्याद्रीनगर, शाहूनगर, शांतीनगर-टिळकवाडी, शास्त्राrनगर, शिवाजीनगर, शिवबसवनगर, नाझर कॅम्प-वडगाव, नेहरुनगर, पापामळा-टिळकवाडी, रामतीर्थनगर परिसरातही पॉझिटिक्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जैनमुनी, सेवकांनाही बाधा
फोर्ट रोड परिसरातील माणिकबाग बोर्डिंगमध्ये वास्तव्यास आलेले जैनमुनी व त्यांच्या सेवकांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून मुनींची प्रकृती चांगली असल्याचे सुत्रांनी सांगितले. काही बाधित सेवकांवर हलगा येथील भरतेश हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.