अनुसूचित वाल्मिकी नोकर संघातर्फे निवेदन
बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाला वीर सिंधूर लक्ष्मण यांचे नाव द्यावे, अशी मागणी कर्नाटक अनुसूचित वाल्मिकी नोकर संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांच्या पुतळय़ाची उभारणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांबरोबर वीर सिंधूर लक्ष्मण यांनी लढा दिला. स्वातंत्र्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. म. गांधींनी ज्या चळवळी केल्या त्यामध्येही त्यांनी भाग घेतला होता. ते वीर योद्धा होते. तेव्हा त्यांचे नाव रेल्वेस्थानकाला द्यावे, अशी मागणी करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन दिले. यावेळी महेश शिग्गीहळ्ळी, मंजुनाथ एन. एम., मोहन किशोर, चंद्रकांत पोलीस आदी उपस्थित होते.