प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे दर्शनासाठी जाणाऱया भाविकांची संख्या वाढली आहे. परिवहनने सौंदत्ती-बेळगाव मार्गावर विशेष बससेवा सुरू केली आहे. मागील महिन्यात पौर्णिमेदरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. आता मंदिर खुले करण्यात आल्याने भाविकांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या सोयीखातर परिवहनने विनाथांबा बससेवा सुरू केली आहे.
बेळगावसह खानापूर, चंदगड, गडहिंग्लज, हुक्केरी, चिकोडी तालुक्मयातून सौंदत्तीला जाणाऱया भाविकांची संख्या अधिक आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव-सौंदत्ती मार्गावर जादा बस सोडण्यात आल्या आहेत. विकेंड कर्फ्यू, नाईट कर्फ्यू त्यापाठोपाठ आता आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल सक्ती मागे घेण्यात आल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. शिवाय रात्रीच्या प्रवासासाठीदेखील बस सुसाट धावत आहेत.
सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱया भाविकांची संख्या वाढली आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून शनिवारी सहा बस सौंदत्तीकडे धावल्या. तसेच प्रवाशांच्या संख्येनुसार बस सोडल्या जात आहेत.