प्रतिनिधी / कडेगाव
बेलवडे ता. कडेगाव येथे सोमवारी रात्री बोरगाव ते ताकारी रस्त्यावर चारचाकी गाडी चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी रस्त्याच्या कडेला पलटी होवून अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून चौघे जखमी आहेत. चारचाकी गाडीतील अक्षय गायकवाड व शुभम सुर्यवंशी असे मयत झालेल्या दोघांचे नाव आहे.

या अपघातात दिपक जगन्नाथ सुर्यवंशी, हरीदादा आनंदा सुर्यवंशी, विठ्ठल सुर्यवंशी व विकास भार्गव सुर्यवंशी अशी जखमींची नावे आहेत. सध्या दिपक सुर्यवंशी व हरीदादा सुर्यवंशी यांच्या कोल्हापुरातील प्रभू हॉस्पिटल येथे तर अक्षय गायकवाड व शुभम सुर्यवंशी या दोघांवर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, इस्लामपूर येथे उपचार सुरु आहेत. अक्षय गायकवाड व शुभम सुर्यवंशी या दोघांच्या आकाली जाण्याने बेलवडे गावावर शोककळा पसरली आहे.