ऑनलाईन टीम / लंडन :
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 26 जानेवारीचा भारत दौरा रद्द केला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या परेडला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे वाढते रुग्ण लक्षात घेता जॉन्सन यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. परिणामी त्यांनी भारत दौरा रद्द केला.
दरम्यान, भारतात प्रजासत्ताक दिनाला दरवर्षी विविध देशांचे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी भारताने जॉन्सन यांना निमंत्रित केले होते. मात्र, ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे जॉन्सन यांनी हा दौरा रद्द केला.