प्रतिनिधी/ सातारा
खरतर प्रत्येकांनी ऑलिंपिक स्पर्धा ऐकल्या व पाहिल्या असतील पण डेफ ऑलिम्पिक स्पर्धा (बहिऱया खेळाडूंची) ही भरविण्यात येतात हे अनेकांनी पहिल्यांदाच ऐकलं असेल. यंदा 24 व्या डेफ ऑलिम्पिक स्पर्धा या ब्राझील येथे होणार आहेत. त्यामध्ये साताऱयाची प्रांजली प्रशांत धुमाळ ही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्रातून पिस्टल खेळामध्ये चमक दाखविणार प्रांजल ही एकमेव खेळाडू आहे. ती मंगळवारी ब्राझीलला रवाना झाले असून त्यापूर्वी क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर व मान्यवरांच्या हस्ते नवी दिल्ली येथे तिचा सत्कार ही करण्यात आला.

या स्पर्धा दि. 1 ते 15 मे या कालावधीत होणार असून, भारतीय खेल प्राधिकरण मंत्रालयाने 11 विविध खेळांडूमधून 64 खेळाडुंची या स्पर्धाकरीता निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सातारची प्रांजलीचा समावेश ही आहे. प्रांजली ही 10 मी. एअर पिस्टल वैयक्ति, 10 मी. एअर पिस्टल मिश्र आणि 25 मी. स्पोर्टस् पिस्टल वैयक्तिक अशा तीन प्रकारातील स्पर्धेमध्ये आपले कौशल्य सिध्द करणार आहे.
प्रांजली ही साताऱयातील तामजाईनगर येथील रहिवासी असून ती लहान पणापासुनच या पिस्टल शुटिंग या खेळ प्रकारात पारंगत आहे. तिने आजवर देशामध्ये विविध ठिकाणी होणाऱया सहभाग दर्शविला होता. यापूर्वी तिने भारतात आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी पार पडलेल्या स्पर्धांमधून सहभाग दर्शवून 10 सुवर्ण पदके व तीन रौप्य, एक कास्य पदके पटकाविली आहेत. प्रांजलीचे वडील प्रशांत धुमाळ यांची गुरूशिल्प नॅचरल अँड मिलेटरी स्कूल असून ते ही आपल्या शाळेच्या माध्यमातून विविध विद्यार्थ्यांचे करिअर घडवितात.
नियमित सराव सुरु
प्रांजलीला लहानपणा पासुनच खेळाप्रकारात अधिक आकर्षण होते. याचीच दखल घेत तिच्या वडीलांनी तिला इयत्ता 5 वी पासुन पिस्टल शुटींगच्या खेळप्रकाराच्या कोर्सला लावले. तिने साताऱयातील शिवराज शुटींग ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातील बालेवाडी येथील शुटींग ऍकॅडमी, सध्या ती दिल्ली आणि पुणे येथे दोन्ही ठिकाणी शुटींचा सराव करत आहे.
दोन्ही मुले खिलाडू वृत्तीची
माझी दोन्ही मुले ही खेळाडू वृत्तीची असून प्रांजल ही पिस्टल शुटींग तर मुलगा प्रधुम्न हा हॉर्स रायडिंगमध्ये पारंगत आहे. नुकतेच त्यांचे ही ऐशियन गेम्स स्पर्धेकरीता निवड झाली आहे. आम्ही मुलांना खेळामध्ये खूप रस असल्याने त्यांना त्यांच्या आवडीच्या खेळ प्रकारात करिअर घडविण्याकरीता नियमीत प्रोत्साहन देतो.
प्रशांत धुमाळ