सांगली / प्रतिनिधी
ब्राह्मण समाजाच्या प्रश्नांविषयी आक्रमक व्हा, असा सल्ला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर गोविंद कुलकर्णी यांनी दिला आहे. आज कुलकर्णी सांगली दौ-या वर आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यां बरोबर आढावा बैठक घेतली.
दौ-या दरम्यान कुलकर्णी यांनी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ ह्यांची भेट घेतली. ह्या भेटीत समाजाचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याविषयी दोघांच्यात सकारात्मक चर्चा झाली. तसेच सांगलीतील प्रथितयश उद्योजक गिरिष चितळे ह्यांची मानव संसाधन मंत्रालया च्या समिती मध्ये निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार डॉक्टर गोविंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
ह्या वेळी प्रदेश उपाध्यक्ष अरुण दांडेकर, प्रदेश सदस्य केदार खाडीलकर, जिल्हा संघटक नंदकुमार बापट, जिल्हा अध्यक्ष मंगेश ठाणेदार , जिल्हा कोषाध्यक्ष जतकर जिल्हा पुरोहित आघाडी अध्यक्ष अमोल कुलकर्णी, शहर अध्यक्ष शुभम कुलकर्णी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleविद्यापीठ हायस्कूलचे निवृत्त शिक्षक वि. गो. देसाई यांचे निधन
Related Posts
Add A Comment