ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ब्रिटनमधून भारतात आलेल्या 6 प्रवाशांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे.
भारतासह अन्य देशांनी ब्रिटीनमधून येणारी विमानसेवा थांबवली आहे. मात्र, 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान, ब्रिटनमधून 33 हजार नागरिक भारतात परतले आहेत. त्यांचा शोध घेऊन कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 144 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांचे नमुने कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बेंगळूर, एनआयएमएचएएनएस बेंगळूर, आयजीआयबी दिल्ली आणि एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले. त्यामधील 6 बधितांमध्ये नवा स्ट्रेन आढळून आला.