साहित्य : 4 ब्राऊन ब्रेड स्लाईस, पाव वाटी तांदळाचे पीठ, 3 चमचे रवा, 1 वाटी दही, अर्धी वाटी किसलेलं गाजर, 1 कांदा बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, पाव चमचा आलं पेस्ट, 2 कढीपत्ता पाने बारीक चिरून, 2 चमचे कोथिंबीर बारीक चिरून, पाव चमचा काळीमिरीपूड, अर्धा चमचा जिरं, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल
कृती : बाऊलमध्ये ब्राऊन बेडचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत. नंतर त्यात तांदळाचे पीठ आणि रवा मिक्स करावा. आता त्यात दही, गाजर, कांदा, हिरवी मिरची, आलं पेस्ट, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून मिश्रण मिक्स करावे. नंतर त्यात काळीमिरीपूड, जिरं आणि मीठ मिक्स करून त्याचा गोळा मळून वीस मिनिटे झाकूण ठेवावा. वाटल्यास पाणी वापरू शकता. आता हाताला थोडेसे तेल लावून मळलेल्या गोळय़ाचे मध्यम आकाराचे गोळे करून त्याला चपटा आकार द्यावा. गरम तेलात वडा सोडून सोनेरी रंगावर तळून पेपरनॅपकीनवर काढावेत. तयार क्रिस्पी वडा चटणी अथवा सॉससोबत खाण्यास द्या.