मेजर ध्यानचंद सिक्स ए साईड हॉकी स्पर्धा

प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित मेजर ध्यानचंद चषक सिक्स ए साईड आंतरशालेय हॉकी स्पर्धेत अंतिम सामन्यातून जी.जी. चिटणीस, ज्ञानमंदिर, सेंट जॉन काकती, एम. आर. भंडारी, ज्ञान मंदिर संघानी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजेतेपद पटकाविले.
मेजर बी. ए. सय्यद हॉकी मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक गटात मुलींमध्ये सेंट
जॉन काकतीने विजेतेपद तर जीजी चिटणीस संघाने उपविजेतेपद पटकाविले. मुलांच्या गटात ज्ञान मंदिरने विजेतेपपद तर एम. आर. भंडारीने उपविजेतेपद पटकाविले. 17 वर्षाखालील मुलींच्या गटात चिटणीस अ संघाने विजेतेपद तर चिटणीस ब संघाने उपविजेतेपद पटकाविले. मुलांच्या गटात एम. आर. भंडारी अ संघाने विजेतेपद तर भंडारी ब संघाने उपविजेतेपद पटकाविले. 14 वर्षाखालील गटात श्रेया चौगुले काकती, मुलांमध्ये शुभम पाटील ज्ञानमंदिर, 17 वर्षाखालील मुलींच्या गटात सुहाना तडकोड कॅन्टोन्मेंट तर मुलांच्या गटात प्रवीण जुटप्पण्णावर यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय पटेल, साकीब बेपारी, खालीक बेपारी, गोपाळ खांडे, एम. बी. नदाफ, प्रकाश हळदणकर, शकील कोतवाल, राजशेखर मोटेबन्नूर, उत्तम शिंदे, सुधाकर चाळके, गणपत कडोलकर, रजनिश पटेल, जी. ए. जागिरदार, विनोद पाटील, इशा गवळी, प्राजक्ता नेसरकर यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाना चषक, प्रमाणपत्र, पदके देवून गौरविण्यात आले. यावेळी बापू देसाई, प्रवीण पाटील, जयसिंग धनाजी, साकीब बेपारी आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते.