वार्ताहर / पणजी
गोमंतक भंडारी समाजाच्या केंद्रीय कार्यालय पणजी येथे समाजाचे माजी अध्यक्ष कै. मधूकर पोकू नाईक यांच्या निधनाबद्दल समाजाच्या केंद्रीय समितीने शोकसभा आयोजित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक कृष्णा नाईक यांनी त्यांच्या समाज कार्याचा उल्लेख करून त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. मधूकर यांनी यानी समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहून भंडारी समाजात आपले जनसेवेचे कार्य चालू ठेवले. कै. मधूकर नाईक फोंडा तालुक्याचे अध्यक्ष असताना आपण सचिव असल्याकारणाने तिथे त्यांच्याबरोबर समाजकार्य करण्याची संधी मिळाली असेही त्यांनी सांगितले.
गोमंतक समाजाचे उपाध्यक्ष देवानंद अर्जुन नाईक यांनी त्यांच्या समाजकार्याचा गौरव करून त्यांच्याबरोबर समाजकार्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. समाजाचे सचिव फक्रू वामन पणजीकर यांनी आपल्या भाषणात त्यांच्या समवेत कार्यकारिणी समितीत त्यांच्याबरोबर राहून समाजकार्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असे सूचित केले. समाजाचे उपाध्यक्ष रुपेश दामोदर नाईक यांनी शोक व्यक्त करून त्यांच्या केलेल्या समाजकार्याचा आढावा घेतला. खजिनदार जोगुसो नाईक यांनी आपले विचार मांडले. उपखजिनदार सुनील कृष्णनाथ नाईक यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. कार्यकारिणी सदस्य कृष्णकांत गोवेकर यांनी त्यांच्या समाज कार्याचा उल्लेख करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यकारीणी सदस्य मंगलदास नाईक व सत्यविजय नाईक तसेच कृष्णनाथ चोपडेकर यांनीही मधूकर नाईक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असे नमूद केले.